SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

राजूर ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन सुधारित प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

schedule10 Jul 26 person by visibility 337 categoryआरोग्य

  मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मौजे राजूर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवून मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

  डॉ. किरण लहामटे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते. या चर्चेत सरोज अहिरे आणि बालाजी काळे यांनी सहभाग घेतला.

  आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, शासन निर्णय दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ अन्वये राजूर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी ११४.७५ कोटी रुपयांच्या ढोबळ अंदाजपत्रकाचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

  मात्र, सादर केलेल्या अंदाजपत्रकात आवश्यकतेपेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि जास्त खर्च नमूद करण्यात आल्याचे निदर्शनास आले. आयपीएचएस-2022 च्या निकषानुसार १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी ९,२५० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम अपेक्षित असल्याने त्यानुसार सुधारित अंदाजपत्रक पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

  मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार, आधी मंजूर झालेली आणि सुरू असलेली आरोग्य विभागाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर प्रलंबित कामांसाठी ईडीबी, राज्य अर्थसंकल्प आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांसह विविध निधी स्रोतांमधून तरतूद करण्यात आली असून त्यामुळे अनेक कामांना गती मिळाल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

  राजूर रुग्णालयाच्या प्रकल्पाला यापूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने विशेष बाब म्हणून सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवून यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id