SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

कोल्हापुरातील कदमवाडीत शिक्षकावर कोयत्याने खुनी हल्ला

schedule26 Dec 22 person by visibility 9697 categoryगुन्हे

कोल्हापूर - कदमवाडी येथील संस्कार शिक्षण मंडळ संचलित सुसंस्कार हायस्कूल मधील शिक्षक संजय सुतार (रा. वरणगे पाडळी) यांच्यावर शाळेच्या आवारातच माजी विद्यार्थ्याने कोयत्याने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

या शाळेत संजय सुतार गेली 25 वर्षे अध्यापनाचे काम करतात. सोमवारी (२६ डिसेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्तींनी सुतार यांना शाळेच्या बाहेर बोलावून घेतले. त्यांची दुचाकी पडली होती. शिक्षक सुतार हे दुचाकी उचलत असताना त्यांच्यावर कोयत्याने वार झाले. एक वार मानेवर बसलेला आहे. शाळेमध्ये आपल्या भावाला शिक्षकांनी मारलेला राग मनामध्ये धरून मोठ्या भावाने त्याच्या मित्रासह शाळेमध्ये येऊन  हल्ला केल्याचे समजते. शाळेमध्ये शिक्षकावरती झालेला हा हल्ला चिंताजनक व निषेधार्थ आहे.  या जखमी शिक्षकाला परिसरातील गॅरेज चालक व रिक्षा चालकाने तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे  प्राण वाचले आहेत.

 दरम्यान, शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. शाहुपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून,  पोलिसांकडून फरार हल्लेखोराचा तपास सुरु आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id