SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास

schedule30 Oct 26 person by visibility 280 categoryमहानगरपालिका

🌀इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थिनींना पासचे वाटप

कोल्हापूर : विद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि प्रवास खर्चाचा आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावी व बारावीच्या कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींसाठी मोफत के.एम.टी. पास वाटप करण्यात आले. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये या मोफत के.एम.टी. पासचे वाटप करण्यात आले.

  कोल्हापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. शिक्षणासाठी नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींच्या अडचणी लक्षात घेऊन महानगरपालिकेने राबविलेला हा उपक्रम शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणारा ठरत आहे.

            या कार्यक्रमास कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रूपाराणी निकम यांनी हस्ते व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती  कौसर इस्माईल बागवान, गटनेते शारंगधर वसंतराव देशमुख, उपसभापती  दीपा अजित ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त मा. शिल्पा देरेकर, स्थायी समिती सभापती विशाल किरण शिराळे, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, अभिजीत शमाराव खतकर, सहाय्यक आयुक्त सौ. उज्ज्वला शिंदे यांच्यासह महिला व बालकल्याण समितीचे सदस्यांच्या हस्ते या पासचे वाटप करण्यात आले.

            यावेळी मनोगत व्यक्त करताना स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार असून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यासही मदत होईल असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

            महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. पी. व्ही. नागवकर आणि पर्यवेक्षक कॅप्टन डॉ. अमित पुंडलिक रेडेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. व्ही. डी. नाईक, प्रा. एस. एस. गावित, प्रा. ची. कांबळे, एस. एस. जाधव, प्रा. एम. सी. तिकोडे आणि प्रा. व्ही. जी. वैराग यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रा. सौ. कुमुदिनी देसाई यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id