SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

कोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

schedule30 Oct 26 person by visibility 313 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : विद्याचे माहेरघर असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महानगरपालिका राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११, कसबा बावडा येथील पवित्र प्रांगणात ‘सीआरसी’ (CRC) क्रमांक ७ अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्रमांक ४ अत्यंत उत्साहात, जल्लोषात आणि शिस्तबद्धतेने संपन्न झाली. ‘शिक्षणामुळेच सर्वांगीण विकास शक्य आहे,’ असा संदेश या परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला.

शाळेचे केंद्रप्रमुख तथा प्रयोगशील मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर सखोल मंथन करण्यात आले.

  डॉ. अजितकुमार पाटील (केंद्रप्रमुख): NEP २०२० च्या पार्श्वभूमीवर करावयाची विविध कामे, शैक्षणिक धोरणातील स्थित्यंतरे आणि शिक्षण क्षेत्रातील आमूलाग्र बदलांवर सविस्तर प्रकाश टाकून त्यांनी उपस्थितांना नव्या युगाच्या शिक्षणाची दिशा दाखवली.

  अमित पोटकुले : दैनंदिन अध्यापनात शिक्षकांना येणाऱ्या समस्या आणि आव्हानांवर चर्चा करून त्यावर उपस्थितांच्या सहभागातून रामबाण उपाय शोधण्यात आले.

  सुनिता मेंगाणे: पाठाचे मासिक नियोजन कसे करावे, याचे विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच एका सुंदर गीताच्या सादरीकरणाने त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.

  दिगंबर बालदे व  दिपाली भापकर: शाळा आणि पालक यांच्यातील अतूट नात्यावर भर देत, शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेची मातृसंस्था असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

  मनीषा देसाई (न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल): राज्याच्या धोरणात्मक मूल्यवर्धन शिक्षण व प्रशिक्षणावर रसाळ वाणीत मार्गदर्शन करत मूल्यशिक्षित विद्यार्थीच उद्याचा सुजाण नागरिक घडवू शकतात, असे प्रतिपादन केले.

शाळेचे उपमुख्याध्यापक  उत्तम कुंभार यांनी नुकत्याच आलेल्या इयत्ता ३ री, ४ थी व ६ वीच्या नवीन मूल्यमापन पद्धतीच्या शासन निर्णयावर विस्तृत मार्गदर्शन करून शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले.  उत्तम पाटील यांनी सुंदर फलकलेखन केले, तर  दिपाली भापकर यांनी ऑनलाईन नियोजनाची धुरा सांभाळली. सूत्रसंचालन श्री. आर. जी. किर्तीकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्या पाटील यांनी अहवाल वाचन करून आभार मानले. बालवाडी मुख्याध्यापक  कल्पना पाटील, सौ. सावित्री काळे, नेमिष्टे मॅडम तसेच सेवक श्री. विशाल चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ज्ञान, अनुभव, गीत, मूल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम ठरलेली ही परिषद उपस्थितांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id