SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 46170 बालकांचे लसीकरण

schedule28 Jun 26 person by visibility 316 categoryआरोग्य

कोल्हापूर  : शासन आदेशाप्रमाणे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी सकाळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या नियोजनाखाली कोल्हापूर शहरात राबविण्यात आली. या मोहिमेस शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते करण्यात आले. 

या लसीकरणाची सुरवात राजेंद्रनगर येथील डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यामंदिर शाळेत महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते तर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आली. 

यावेळी नगरसेवक अमर समर्थ, नगरसेविका निलांबरी साळोखे, रेखा रामचंद्र उगवे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुलेकडील वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी व भागातील नागरीक आदी उपस्थित होते. याशिवाय पदाधिकारी व नगरसेवक यांनी नजिकच्या पालिओ बुथला भेट देऊन या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

या मोहिमेमध्ये 47,867 बालकांना डोस पाजण्याचे उद्दिष्ट होते. या पैकी 46,170 बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. या मोहिमेकरीता शहरात 173 लसीकरण केंद्रात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत डोस पाजण्यात आले. तसेच बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, नाके व महालक्ष्मी मंदीर या ठिकाणी मुलांना डोस पाजण्यात आले. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोहिम यशस्वीपणे राबविणकरीता सहभाग घेत.
या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणा, सी.पी.आर.हॉस्पीटल कडील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स, परिचारीका, नर्सिंग सेंटरकडील प्रशिक्षणार्थी परिचारीका, डॉ.डी.वाय.पाटील नर्सिंग इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल कॉलेज, जगद्गुरु पंचाचार्य मेडिकल कॉलेज, वेणुताई चव्हाण मेडिकल कॉलेज, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, महालक्ष्मी नर्सिंग स्कूल, सिध्दगिरी नर्सिंग इन्स्टिटयुट कणेरी, ऑल इंडिया इन्स्टिटयुट ऑफ़ सेल्फ गोव्हर्नमेंट, अशोकराव माने स्कूल ऑफ नर्सिंग वाठार, संजीवा नर्सिंग कॉलेज, रोटरी क्लब, शहरातील तरुण मंडळे, महिला मंडळे, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये तसेच सेवा-भावी संस्था, एन.सी.सी., विद्यार्थी, महालक्ष्मी मंदिर देवस्थान समिती, रेल्वे विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, बी चॅनल, एस.पी.एन.चॅनल, रेडिओ मिर्ची एफ.एम., कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जी.पी.ए., आय.ए.पी. व छत्रपती राजाराम साखर कारखाना, पोलीस विभाग इत्यांदीचे सहकार्य लाभले .

पोलिओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या मोहिमेमध्ये आज ज्या पात्र बालकांनी पोलिओ डोस घेतले नसतील त्या बालकांना सोमवार, दिनांक 29 जून ते 4 जुलै 2026 रोजीपर्यंत घरभेटीच्या माध्यमातून शोध घेऊन पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत. तरी गृहभेटीकरीता येणा-या आरोग्य कर्मचा-यांना नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id