SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ व गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात

schedule01 Aug 26 person by visibility 3099 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून राम गणेश गडकरी सभागृहात गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव समारंभ, वाड्मय विहार मंडळाचे उद्घाटन,१०० विद्यार्थिनींनी तयार केलेल्या वेबसाईट्सचे लोकार्पण तसेच गरजू विद्यार्थिनींना गणवेश व वह्या वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन प्रशालेच्या वतीने करण्यात आले होते.

स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता पाटील करताना आपल्या मनोगतात उपस्थितांचे स्वागत करत,या शाळेचा सातत्याने उंचावत असलेला शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची निष्ठा व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पालकांचा वाढता विश्वास यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोदकुमार लोहिया होते

प्रमुख पाहुण्या महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते वाड्मय विहार मंडळाचे उद्घाटन तसेच शाळेतील १०० विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या वेबसाईट्सचे अनोखे लोकार्पण करण्यात आले. विविध शालांत व बाह्य परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थिनींना गणवेश व वह्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली.

प्रमुख पाहुणे महापौर रुपाराणी निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्यार्थिनींना आत्मनिर्भर, आत्मविश्वासू आणि ध्येयवेडे बनण्याचे आवाहन केले. 

अध्यक्षीय भाषणात विनोदकुमार लोहिया यांनी द न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा गौरवशाली इतिहास सांगत सकारात्मक विचार, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला.

प्रमुख उपस्थिती संस्थेचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर, स्कूल कमिटी सदस्या  उत्कर्षा पाटील, मनिषा वाडीकर,नगरसेविका दीपा काटकर, नगरसेविका माधुरी व्हटकर, सुजाता निर्मल लोहिया, श्रीमती अनेरी दिपक लोहिया, डॉ.शीतल धर्माधिकारी, सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव  एस. एस.चव्हाण ,  ओंकार व कल्याणी राशीनकर इ. मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमास पालक, शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आभार  उपमुख्याध्यापक रत्नाकर घाटगे यांनी मानले. सूत्रसंचालन अस्मिता पाटील आणि मृणाल कुलकर्णी यांनी केले.

 शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, साहित्यप्रेम आणि सामाजिक संवेदनशीलता यांचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id