SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई; व्हिसा संपलेला कांगो नागरिक हद्दपार

schedule04 Jul 26 person by visibility 375 categoryगुन्हे

कोल्हापूर: कोल्हापूर पोलिसांच्या परदेशी नागरिक नोंदणी शाखेने (FRO) मोठी कारवाई करत भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या कांगो देशाच्या नागरिकाला मायदेशी हद्दपार केले आहे. ॲडेलिन कात्शोको त्सिबांफुमू असे या परदेशी नागरिकाचे नाव आहे.

कांगोचा नागरिक ॲडेलिन हा हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी शिक्षण संस्थेत आला होता. दरम्यान, संबंधित संस्थेने परदेशी नागरिक नोंदणी शाखेकडे याची माहिती दिली. एफआरओ शाखेने तपासणी केली असता, त्यांच्या व्हिसाची मुदत ७ जानेवारी २०२५ रोजीच संपल्याचे समोर आले. ८ जानेवारी २०२५ पासून तो भारतात बेकायदेशीरपणे राहत होता.

या नागरिकाबाबत अधिक तपास केला असता, बेंगळुरू येथील कोथनूर पोलीस ठाण्यातही त्याच्यावर 'मुदतबाह्य वास्तव्य' केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. बेंगळुरूच्या मेयो हॉल न्यायालयात ३ जुलै रोजी सुनावणी होती. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिसांनी २ जुलै रोजी रात्री त्याला कोल्हापूर ते बेंगळुरू नेले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला ४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि त्याला तातडीने हद्दपार करण्याचे निर्देश देण्यात आले.

न्यायालयाचे आदेश मिळताच, पोलिसांनी ४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे पोहोचवले. तेथून ११.०५ वाजताच्या विमानाने त्याला त्याच्या मायदेशी (कांगो) रवाना करण्यात आले.


या कारवाईत एफआरओ शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र सोनसुरकर, पोलीस हवालदार दीपक ढंग, अनिरुद्ध केसरकर तसेच हातकणंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी, मदन मधाळे, शंतनू देसाई, विकी भंडारे आणि चालक सागर कदम, आकाश गायकवाड, गणेश दंदाले यांनी मोलाची भूमिका बजावली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id