SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सरनोबतवाडीत गॅरेजना आग... सुमारे पस्तीस लाखाचे नुकसानकोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या समन्वयासाठी पोलिस प्रशासन, महापालिका व‍ नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त उद्या ग्रंथदिंडी; ग्रंथमहोत्सवाचे होणार उद्घाटनसोलापूर येथील आंतरराष्ट्रीय रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकरचे यश ‘कॅमेरा तंत्र’वर उद्या मंगळवारी विद्यापीठात कार्यशाळापुन्हा एकदा जिल्हयासह राज्यात महायुतीला दणदणीत यश, विकासकेंद्रीत कामाला जनाधार : खासदार धनंजय महाडिकबुद्ध आणि बाबासाहेबांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जग बदलाला मदत करणारे : पार्थ पोळके७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी 'महापारेषण' आणि 'महानिर्मिती'मध्ये सामंजस्य करारकोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील मतमोजणी प्रक्रिया शांततेत; विजय उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष, नगरपालिका निकाल पुढील प्रमाणे...शिवाजी विद्यापीठात एमएसएमई व स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शक संवाद सत्र

जाहिरात

 

डीकेटीईच्या दीपक खुबन्नावरची स्केटिंगमध्ये दबदबा दोन सुवर्णपदकांसह राज्यस्तरवर निवड

schedule12 Dec 25 person by visibility 194 categoryक्रीडा

इचलकरंजी : डीकेटीई संस्थेतील द्वितीय वर्ष कॉम्पुटर विभागातील दीपक खुबन्नावर यांने ६ वी आरजीओआय कोल्हापूर जिल्हा स्केटिंग स्पर्धा २०२५ गडहिंग्लज मध्ये कर्तत्वाचे नवे शिखर गाठत एकाच वेळी दोन सुवर्णपदकांची ऐतिहासिक कमाई केली आहे. अत्यंत वेगवान, परफेक्ट संतुलन, अचूक नियंत्रण आणि मैदानावरील आत्मविश्‍वास यांच्या जोरावर दिपकने जिल्हायातील अव्वल स्केटर्सना दमदार टक्कर देत प्रथम क्रमांक पटकविला. डीकेटीई सदैव विद्यार्थ्यांना शैक्षणिक, तांत्रिक तसेच क्रिडा क्षेत्रात सर्वांगीण प्रगतीसाठी प्रेरित करत आली आहे. उत्कृष्ट प्रशिक्षण सुविधा, क्रिडामनस्क वातावरण आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांच्या जोरावर डीकेटीईमधील विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. दिपकची ही सुवर्णकामगिरी डीकेटीईच्या तेजात आणखी भर घालणारी ठरली आहे.

स्पर्धेच्या सुरवातीपासूनच त्याची खेळातील पकड, तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण स्टॅमिना सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक राउंडमध्ये कौशल्याची वरची पातळी गाठत दीपकने निर्णायक आघाडी मिळवत दोन सुवर्णपदके आपल्या नावावर केली. ही यशस्वी कामगिरी केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून, डीकेटीईच्या क्रिडाक्षेत्रातील भक्कम पायाभरणीचे प्रतीक ठरली आहे. या दुर्मिळ कामगिरीमुळे दीपकची निवड आगामी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी झाली असून, डीकेटीईचा क्रिडा क्षेत्रातील दबदबा अधिकच बळकट झाला आहे. दीपकच्या सातत्यपूर्ण मेहनत, कडक शिस्त, प्रचंड निष्ठा आणि प्रशिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचे हे फलित आहे.

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी डीकेटीईकडून वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात येते यामुळेच येथील विद्यार्थी अशा स्पर्धेमध्ये विविध कला गुणांचे सादरीकरण करुण आपला ठसा अशा स्पर्धेमध्ये उमटवतात यामुळेच इचलकरंजी आणि डीकेटीईचे नांव अशा विविध स्पर्धेमध्ये सन्मानाने घेतले जाते.

दीपकला संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त, संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु. जे. पाटील, स्पोर्टस इनचार्ज ओंकार खानाज यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id