SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

राज्याचे साखर आयुक्त डाॅ. संजय काेलते यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेट

schedule27 Jul 26 person by visibility 294 categoryउद्योग

हुपरी : महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डाॅ. संजय काेलते यांनी साेमवारी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यास सपत्निक सदिच्छा भेट दिली. यावेळी साखर आयुक्त यांनी कारखान्याच्या ऊस विकास याेजनेतून कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेती केलेल्या क. सांगाव येथील सुरेश नाभिराज मगदूम या सभासद शेतकऱ्याच्या ऊस शेतीची आणि तळंदगे येथील कारखाना पुरस्कृत जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्थेर्माफत राबविण्यात आलेल्या 100 टक्के क्षेत्रावरील स्वयंचलित ठिबक सिंचन याेजनेची पहाणी करून समाधान व्यक्त केले. त्यांच्यासाेबत काेल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर)  उज्वला पळसकर याही उपस्थित हाेत्या.

साखर आयुक्त यांनी कारखान्यासही भेट देऊन उभारणीपासूनची सविस्तर माहिती घेतली. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी कारखान्याच्या स्थापनेपासून सभासद शेतकऱ्यांसाठी कारखाना अत्यंत प्रभावीपणे ऊस विकास याेजना राबवित असल्याचे सांगितले. कारखान्याच्या मशिनरी उभारणीपासून सहवीज निर्मिती, कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान, सभासद शेतकèयांसाठी विविध कल्याणकारी याेजना इत्यादीबाबत विविध उपक्रमांची सखाेल माहिती दिली.

यावेळी साखर आयुक्त यांनी कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि आर्थिक बांधिलकी जपून कारखाना सभासद शेतकèयांचे हित साधत आहे. कारखान्याच्या कृत्रिम बुध्दिमत्ता ऊस शेती तंत्रज्ञानामध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा आणि ठिबक सिंचनसाठी सहकारी संस्थेचा सहभाग हा राज्यातील इतर कारखान्यांना अनुकरणीय असा असल्याचे नमूद केले. जवाहरसारखी ठिबक सिंचन याेजना इतर कारखान्यांनीही राबविली पाहिजे.

 कारखान्याने आतापर्यंत शासन, शेतकरी, कामगार, वित्तीय संस्था अशा काेणत्याही घटकाची थकबाकी ठेवलेली नाही ही एक अत्यंत जमेची बाजू असून कारखान्याचे सभासद, संचालक मंडळ आणि अधिकारी-कर्मचारी यांच्या कामाची ही पाेहाेच पावती आहे असे प्रशंसनीय उद्गार काढले. मागील हंगामात ऊसाची कमतरता असल्याने राज्यातील सर्व कारखाने जेमतेम मार्चअखेरपर्यंत चालले. जवाहरसारख्या वैशिष्ट्यपूर्ण काम असणाèया कारखान्यांचे अनुकरण राज्यातील इतर कारखान्यांनी केले पाहिजे. ऊस विकास याेजनेद्वारे कारखान्यांनी जास्तीत जास्त एकरी ऊस उत्पादन वाढवून आर्थिकदृष्ट्या समृध्द हाेणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने राज्यातील निवडक कारखान्यांना माझ्या भेटी सुरू असल्याचे सांगितले. सभासद शेतकèयांनी टिशु कल्चरची राेपे अथवा ऊस वियांणांमध्ये बदल केल्यास निश्चितपणे ऊस उत्पादन वाढेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कारखान्याच्या समस्यांबाबत पाठपुरावा करीत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कारखान्याच्या एकंदरीत सर्व कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन, सर्व संचालक, कार्यकारी संचालक श्री. मनाेहर जाेशी, तळंदगेचे जवाहर पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन व संचालक उपस्थित हाेते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id