SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

कोल्हापूर : तावडे हॉटेल ते कावळा नाका चौक परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई

schedule28 Jul 26 person by visibility 351 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.4 छ.ताराराणी मार्केट व अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज तावडे हॉटेल ते कावळा नाका चौक या मुख्य रस्यावर धडक कारवाई करत अनधिकृत साहित्यांवर आज कारवाई करण्यात आली. 

या कारवाईमध्ये 3 लोखंडी हातगाडी, 4 ॲगंल बोर्ड, 6 स्टॅण्डबोर्ड, 23 कॅरेट, 5 खुर्ची, 1 एलईडी स्क्रिन व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

महानगरपालिकेच्या ठराव क्र.83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. आजची मोहिम उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. 

या कारवाईमध्ये सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्र. 4 कडील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id