SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

कोल्हापूर शिवसेनेत मोठा भूकंप: जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा तडकाफडकी राजीनामा!

schedule25 Jun 26 person by visibility 487 categoryराजकीय

कोल्हापूर: कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आज एक मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख आणि माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आज २५ जून २०२६ रोजी त्यांनी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला असून, या निर्णयाने संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करत असलेल्या इंगवले यांनी आपल्या राजीनाम्यात अत्यंत मोजक्या शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. मागील दहा वर्षांत दोन वेळा शहरप्रमुख आणि सध्या जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या इंगवले यांनी, "कोणतेही राजकीय विश्लेषण न करता मी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे," असे स्पष्ट केले आहे.

इंगवले यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे की, ते भविष्यात कोणता मोठा राजकीय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐनवेळी आलेल्या या राजीनाम्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय पटलावर मोठे स्थित्यंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id