SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांना आमदार यड्रावकर यांचा जाहीर पाठिंबा

schedule02 Aug 26 person by visibility 253 categoryराज्य

शिरोळ : समस्त लिंगायत समाजाच्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि विविध मागण्यांसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर समाजाच्या विविध मागण्यांसाठी लिंगायत  समाजाला जाहीर पाठिंबा दिला असून समाज बांधवांचा प्रश्न शासन स्तरावर सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. 

जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत्त दर्जा देणे, महामंडळासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणे, लिंगायत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृहे उभारणे, शैक्षणिक सुविधा वाढविणे, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे या समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्णपणे न्याय्य असून त्या तातडीने मान्य कराव्यात या मागण्या समाजाच्या आहेत. 

यावेळी बोलताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, समस्त लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच समाजातील विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्व समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी समाजाच्या पाठीशी उभे आहे.
 
ते पुढे म्हणाले की, युवकांचे उज्ज्वल भविष्य घडविणे, महिलांचे सक्षमीकरण करणे आणि समाजाच्या विकासाला गती देणे हा प्रमुख उद्देश आहे. समस्त लिंगायत समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्यात मी कायम समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शासनाने समाजाच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, यासाठी शासन स्तरावर पूर्ण ताकतीनिशी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त  केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id