SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

कोल्हापुरात मोठी कारवाई: १५ पोलीस ठाण्यांमधील ५१५ किलोहून अधिक अमली पदार्थ नष्ट!

schedule08 Jul 26 person by visibility 408 categoryगुन्हे

कोल्हापूर  : महाराष्ट्र शासनाच्या 'नशामुक्त महाराष्ट्र' अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण व धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर तथा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मिळालेल्या प्रेस नोटनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील १५ पोलीस ठाण्यांमधील ८९ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा, चरस आणि एमडी (MD) असा एकूण ५१५ किलो ४७२ ग्रॅम वजनाचा अज्ञातांचा/अमली पदार्थ न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नाश समितीसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नष्ट करण्यात आला आहे.

▪️कारवाईचा तपशील:
 * जप्त अमली पदार्थांचे प्रमाण: एकूण ५१५ किलो ४७२ ग्रॅम (गांजा, चरस, एमडी).
 * संबधित पोलीस ठाणी: लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, करवीर, शाहूपुरी, शिरोली एम.आय.डी.सी., गोकुळ शिरगाव, शाहूवाडी, शाहापूर, हुपरी, वडगाव, आजरा, गावभाग, गांधीनगर, शिवाजीनगर आणि इस्पुर्ली या १५ पोलीस ठाण्यांमधील ८९ गुन्हे.

 * नाश ठिकाण: हा नाश प्रक्रिया जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प, कसबा बावडा, कोल्हापूर येथे पार पाडण्यात आली.

▪️नाश समिती व अधिकारी उपस्थिती:
सदर अमली पदार्थ नष्ट करण्याची ही प्रक्रिया पोलीस अधीक्षक  नीलोत्पल (भा.पो.से.) यांच्या अध्यक्षतेखाली व नियंत्रणाखाली पार पडली. या नाश समितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक (गड विभाग कॅम्प इचलकरंजी)  अण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्काचे उपअधीक्षक/अति.कार्य.अधीक्षक  युवराज शेषराव शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण तसेच फॉरेन्सिक लॅब कोल्हापूरचे तज्ज्ञ, वजन मापे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी आणि दोन शासकीय पंच उपस्थित होते. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार अशोक पोवार, अरविंद पाटील, युवराज पाटील, अमित सर्जे, राजु येडगे, निवती माळी, राजेश राठोड आणि संजय हुंबे आदी अधिकारी व अंमलदारांनी ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id