SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ‘गोकुळ’च्या कार्यपद्धतीचे कौतुक

schedule29 Jul 26 person by visibility 347 categoryउद्योग

◼️गोकुळ डेअरी प्रकल्पाची पाहणी; शेतकरीहिताच्या योजना व  व्यवस्थापनाची घेतली माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार विभागातील उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) यांच्या शिरगाव येथील दुग्ध प्रकल्पास सदिच्छा भेट देऊन संघाच्या कार्यपद्धतीची पाहणी केली. यावेळी दूध संकलन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच दूध उत्पादक सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेवासुविधांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. गोकुळ परिवारातर्फे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे तसेच सदस्य सागर बलकवडे व डॉ. चंद्रकांत परुळेकर यांच्या हस्ते उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी हातकणंगलेचे उपनिबंधक नारायण परजणे म्हणाले, “गोकुळ दूध संघ हा राज्यातीलच नव्हे तर देशातील सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य व आदर्श दूध संघ आहे. प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट दिल्यानंतर येथील स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्थापन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादन प्रक्रियेतील गुणवत्ता नियंत्रण आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती पाहून समाधान वाटले. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत ग्राहकांना दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याचे गोकुळचे कार्य निश्चितच सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. संघाच्या प्रगतीमध्ये पदाधिकारी, दूध उत्पादक सभासद, दूध संस्था, अधिकारी, कर्मचारी, वितरक आणि ग्राहक या सर्व घटकांचे मोलाचे योगदान आहे. गोकुळमधील आधुनिक दूध प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची आणि संघाच्या कामकाजाची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. तसेच गोकुळच्या दर्जेदार दुग्धजन्य उत्पादनांचा आस्वादही घेतला. भविष्यातही गोकुळ दूध संघ प्रगतीची नवी शिखरे गाठत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.”

यावेळी डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी दूध संकलनापासून प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, अत्याधुनिक यंत्रसामग्री, उत्पादन व्यवस्थापन आणि ग्राहकांपर्यंत दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ पोहोचविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली. कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दूध उत्पादक सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, सेवा-सुविधा, संघाचे गुणवत्ता धोरण तसेच सहकार क्षेत्रातील गोकुळच्या योगदानाचा आढावा उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडला.

या भेटीमुळे सहकार विभाग आणि गोकुळ दूध संघ यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, सहकार क्षेत्रातील आदर्श कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अशा सदिच्छा भेटी उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या भेटीदरम्यान हातकणंगले उपनिबंधक नारायण परजणे  सहाय्यक निबंधक युसूफ शेख (कोल्हापूर), अमित गराडे (राधानगरी), सुजय कदम (शाहूवाडी), चंद्रकांत मगर (पन्हाळा), समीर जांबोटकर (कागल), रमेश बारडे (गगनबावडा), संदीप शिंदे (भुदरगड), प्रेमदास राठोड (करवीर) तसेच सहाय्यक निबंधक (प्रशासन) चंद्रकांत इंगवले, दिपा पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, रमेश पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id