SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

विना परवाना व्यवसायांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई ; एक लॉज सील व तीन आस्थापनांना समज

schedule28 Jul 26 person by visibility 290 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  :महानगरपालिकेच्या परवाना, अग्निशमन, घरफाळा व विभागीय कार्यालय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी शहरात विना परवाना व्यवसायांवर कारवाई करत एक लॉज सील केले. हि कारवाई बिन खांबी गणेश मंदीर येथील मयुरेश लॉजिंग या लॉजवर सीलची कारवाई करण्यात आली. तसेच या परिसरातील तीन व्यवसाय आस्थापनांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत समज देण्यात आली. 

आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी विना परवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित व्यवसायधारकांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, तीन व्यवसाय आस्थापनांनी नवीन व्यवसाय परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले असले तरी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अद्याप न केल्याने त्यांना समज देण्यात आली आहे.

सदरची कारवाई उपआयुक्त किरणकुमार धनवाडे आणि सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी परवाना अधीक्षक अशोक यादव, परवाना निरीक्षक शिवाजी कोकरे, संदीप भोई, स्थानक अधिकारी विजय सुतार, घरफाळा व विभागीय कार्यालय क्रमांक 2 चे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id