SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीस

schedule08 Jul 26 person by visibility 489 categoryगुन्हे

पेठवडगाव: भर पावसात, लोकांची ये-जा सुरू असताना भररस्त्यात घडलेल्या एका भीषण खुनाने पेठवडगावच्या शांततेला गालबोट लावले आहे. कौटुंबिक वादाचा कडेलोट झाल्याने पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला चढवला. या अमानुष हल्ल्यात अमृता कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

​भरबाजारपेठेत दिवसाढवळ्या घडलेल्या या कृत्यामुळे उपस्थित नागरिक प्रचंड भयभीत झाले होते. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेतले असून, गुन्हेगाराला लवकरच जेरबंद केले जाईल, असे संकेत पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांनी दिले आहेत. 

सध्या पोलीस पथक संशयित पतीचा कसून शोध घेत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id