यशवंत विद्यालयमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात
schedule20 Dec 25 person by visibility 182 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : गजानन महाराज नगर येथील यशवंत विद्यालय मध्ये शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी शाळेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात पार पडली शाळेतील प्रत्येक इयत्तेतील चार विद्यार्थी सरप्राईज टेस्ट घेऊन निवडले होते.
स्पर्धेमध्ये चार गट तयार केले होते. त्या गटांना निशिगंधा, चाफा, जुई व मोगरा अशी नावे दिली होती स्पर्धेमध्ये एकूण तीन फेऱ्या होत्या तर चौथी फेरी ही बजर फेरी होती.
अखेर चाफा गटाने 21 गुणांसह अव्वल स्थान पटकावले तर निशिगंध गट 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावरती राहिला विजेत्या गटातील सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. स्पर्धेचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले तर गुणलेखन वंदना कांबळे यांनी केले पंच म्हणून जयश्री चौगले यांनी काम पाहिले.
यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तृप्ती चांदेकर व साक्षी सरनाईक यांचे सहकार्य लाभले.





