निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यालयांची अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून पाहणी
schedule12 Dec 25 person by visibility 172 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तयारीचा एक भाग म्हणून सात निवडणूक निर्णय अधिकारी (R.O. व A.R.O.) यांच्या कार्यालयांसाठी आवश्यक असणाऱ्या कार्यालयांची पाहणी आज अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी केली.
या पाहणी दरम्यान निवडणूक कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी या ठिकाणी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, जागेची उपलब्धता, आवश्यक तांत्रिक बाबी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी हॉकी स्टेडियम, राजोपाध्येनगर बॅडमिंटन हॉल, दुधाळी मैदान, गांधी मैदान, शेठ रुईया विद्यालय, छत्रपती शिवाजी मार्केट येथील पाणीपुरवठा विभाग, तसेच एलबीटी कार्यालय या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी जागा, सोयीसुविधा आणि व्यवस्था करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी जल अभियंता हर्षजीत घाटगे, निवडणूक अधिक्षक सुधाकर चल्लावाड, कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.





