SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सरनोबतवाडीत गॅरेजना आग... सुमारे पस्तीस लाखाचे नुकसानकोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या समन्वयासाठी पोलिस प्रशासन, महापालिका व‍ नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त उद्या ग्रंथदिंडी; ग्रंथमहोत्सवाचे होणार उद्घाटनसोलापूर येथील आंतरराष्ट्रीय रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकरचे यश ‘कॅमेरा तंत्र’वर उद्या मंगळवारी विद्यापीठात कार्यशाळापुन्हा एकदा जिल्हयासह राज्यात महायुतीला दणदणीत यश, विकासकेंद्रीत कामाला जनाधार : खासदार धनंजय महाडिकबुद्ध आणि बाबासाहेबांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जग बदलाला मदत करणारे : पार्थ पोळके७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी 'महापारेषण' आणि 'महानिर्मिती'मध्ये सामंजस्य करारकोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील मतमोजणी प्रक्रिया शांततेत; विजय उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष, नगरपालिका निकाल पुढील प्रमाणे...शिवाजी विद्यापीठात एमएसएमई व स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शक संवाद सत्र

जाहिरात

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

schedule19 Dec 25 person by visibility 182 categoryशैक्षणिक

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक नोंदणी व माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर रविकिरण पाटील यांनी केले आहे.

या योजनेसाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टलवरील https://prematric.mahait.org/Login/Login लॉगिनद्वारे शाळेची नोंदणी करणे आवश्यक आहे. प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्ज नोंदणी करताना मुख्याध्यापकांनी Pre_SE27XXXXXXXXX_Principal हा युजर आयडी व Pass@123 हा पासवर्ड वापरून लॉगिन करावे. त्यानंतर शाळेचे प्रोफाइल, मुख्याध्यापक व लिपिकांची माहिती तसेच विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.

 
विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहेत, त्या संबंधित शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान काही अडचणी उद्भवल्यास संबंधितांनी लेखी स्वरूपात कळवावे अथवा astdirmumcityvint@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुख्याध्यापक व शाळा कर्मचारी यांनी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सहकार्य करावे. एकही पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id