SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

डॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात आरोग्यदायी उपक्रम: 'भाजप' आणि 'भागीरथी'च्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

schedule01 Jul 26 person by visibility 520 categoryआरोग्य

कोल्हापूर  : निरोगी आणि व्याधीमुक्त शरीर हीच खरी संपत्ती आहे. आजच्या धावपळीच्या युगात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून, वैद्यकीय तपासणी करुन नागरिकांनी वेळीच आरोग्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. डॉक्टर्स डे निमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने झालेल्या वैद्यकीय तपासणी शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली. तसेच डेंटीस्टकडून नागरिकांच्या दातांची तपासणी करून गरजेनुसार उपचार करण्यात आले.

डॉक्टर्स डे चे औचित्य साधून, भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने कोल्हापुरातील रामानंदनगर येथील बालाजी पार्कमध्ये, वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. 

गोपालकर क्लिनिकच्या सहकार्याने झालेल्या या शिबिराला अरुंधती महाडिक, नगरसेवक विजयसिंह खाडे, युवराज माने, डॉ. सुप्रिया गोपालकर, डॉ. सुनिती गोपालकर, डॉ. सोहम गोपालकर, डॉ. शुभम पाटील, डॉ. विजयकुमार गोपालकर, डॉ. तिलोत्तमा गोपालकर, डेंटीस्ट डॉ. निकीता कापसे, गर्जना आखाड्याचे अध्यक्ष नाना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी अरुंधती महाडिक यांनी वैद्यकीय शिबिराच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. हल्लीच्या काळात सर्वचजण धावपळ आणि तणावात असतात. अवेळी जेवण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, फास्टफूड, जंकफूडचे सेवन यामुळे विविध व्याधी जडत आहेत. नोकरी किंवा व्यवसायामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र निरोगी आयुष्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. व्याधी झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा, आजार होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे, असे  अरुंधती महाडिक यांनी सांगितले. 

यावेळी डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची वैद्यकीय तपासणी करत, सल्ला-मार्गदर्शन दिले. तर डॉ. निकीता कापसे यांनी मौखिक आरोग्याची तपासणी केली. दातांची तपासणी करत, डॉ. कापसे यांनी गरजेनुसार दंतोपचार केले. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी भागीरथी संस्थेच्या स्वयंसेविका स्नेहल खाडे, राधा मेस्त्री, ऐश्वर्या देसाई, मीना पाटील, खाटिक समाजाच्या अध्यक्षा सुनीता घोडके, बालाजी हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी तुपारे, सचिव राजाराम निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id