SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

​'रोटरी मिडटाऊन', 'भागीरथी' आणि 'वस्त्रम्'चा आदर्श उपक्रम; शिलाई प्रशिक्षणातून महिला होताहेत उद्योजिका

schedule01 Aug 26 person by visibility 371 categoryसामाजिक

कोल्हापूर  : ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी आणि प्रगत झाल्या पाहिजेत, या हेतुने रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था आणि वस्त्रम् गारमेंटच्यावतीने महिलांना मोफत प्रशिक्षण आणि शिलाई मशिन प्रदान उपक्रम राबवण्यात येत आहे. वडणगे परिसरातील सुमारे १०० महिलांना प्रशिक्षित बनवले जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ महिलांना प्रशिक्षण देवून त्यांना वर्षभरापूर्वी शिलाई मशिन देण्यात आली आहेत. या मशिनधारक महिलांच्या स्वावलंबनाचा प्रवास जाणून घेण्यासाठी  अरूंधती महाडिक यांच्यासह रोटरी सदस्यांनी लाभार्थी महिलांना भेट देवून माहिती घेतली.

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था आणि करवीर तालुक्यातील वडणगे मधील वस्त्रम संस्थेच्यावतीने २५ महिलांना शिलाई कामाचे मोफत प्रशिक्षण देवून, त्यांना २५ शिलाई मशिन प्रदान करण्यात आली आहेत. ग्लोबल ग्राम अंतर्गत हा उपक्रम रोटरी मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा  अरूंधती महाडिक यांच्या कार्यकालात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान शिलाई मशिन घेतलेल्या महिलांच्या स्वावलंबनाचा आणि प्रगतीचा प्रवास जाणून घेण्यासाठी  अरूंधती महाडिक यांनी, रोटरी सदस्यांसमवेत लाभार्थी महिलांच्या घरी भेट दिली. यावेळी महिलांनी या प्रशिक्षणाचा आणि मिळालेल्या शिलाई मशिनचा आपल्या व्यवसायासाठी मोठा फायदा झाल्याचे सांगितले. शिलाई मशिनद्वारे रोजगाराचे साधन उपलब्ध झाल्याने, मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेवून, आपण भरघोस कमाई करत असल्याचे आणि त्यामुळे कुटूंबही सुखी समाधानी बनल्याचे लाभार्थी महिलांनी सांगितले. 

दरम्यान हा उपक्रम पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरला आहे. आता पुढील टप्प्यात २५ महिलांना या महिन्यात प्रशिक्षण आणि त्यानंतर मोफत शिलाई मशिन देणार आहे. एकूण १०० महिलांना प्रशिक्षित करून, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत, आत्मनिर्भर बनवणार असल्याचे  अरूंधती महाडिक यांनी सांगितले. या भेटी वेळी रोटरीचे राजाराम शिंपुकडे, प्रतिभा शिंपुकडे, लक्ष्मी शिरगावकर, योगिनी कुलकर्णी आणि वस्त्रम गारमेंटच्या वर्षा संकपाळ उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id