SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा कोल्हापूर व के.एम.टी. उपक्रमाच्या वतीने आयोजित “प्रवासी दिन” उत्साहात साजरा

schedule25 Jan 26 person by visibility 357 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज “रथसप्तमी” निमित्त प्रवासी दिनाचे आयोजन श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे  करणेत आले होते.   यावेळी  अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत सदस्य प्रसाद बुरांडे यांचे हस्ते के.एम.टी. बसचे पूजन करुन प्रवाशांना गुलाब पुष्प आणि तिळगुळ वाटप करुन शुभेच्छा देणेत आल्या. 

ग्राहक पंचायतीच्या वतीने अधिकाधिक प्रवासी नागरिकांनी के.एम. टी. बसचा वापर करणेचे आवाहन करण्यात आले.  यावेळी वाहतूक निरिक्षक नितीन पोवार, अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर अध्यक्ष विनायक वाळवेकर, उपाध्यक्ष कमलाकर बुरांडे, सुहास गुरव, सचिव प्रशांत चौगले, खजानीस सुरज कुलकर्णी, ज्येष्ठ सदस्य रविंद्र घाटगे, यांनी प्रवाशांना प्रवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

या कार्यक्रमास मेकॅनिकल सुपरवायझर  रणधीर मोरे, लेखापाल राजू सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक नितीन पोवार, कामगार अधिकारी संजय इनामदार, कसुरी विभागप्रमुख प्रदिप म्हेतर, लेखापरीक्षक दिनेश सोमण, स्थानक प्रमुख सुनिल पाटील,  वाहतूक नियंत्रक अरुण घाटगे,  अपघात प्रमुख संतोष शिणगारे, तौफिक भालदार, हेमंत हेडाऊ, मारुती पोवार , विवेक साठे, तसेच के.एम.टी.च्या सर्व विभागांकडील कर्मचारी व प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id