SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

कंदलगाव हादरले! शेतवाडीत ४५ वर्षीय इसमाचा गळा आवळून निर्घृण खून; कोल्हापुरात खळबळ

schedule22 Jul 26 person by visibility 376 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कंदलगाव–कणेरी मठ हद्दीतील गिरगाव रोड परिसरात बुधवारी मध्यरात्री एका ४५ वर्षीय व्यक्तीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून आणि तोंडावर मारहाण करून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कंदलगाव, कणेरी मठ परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महादेव बाळू बोडके (वय ४५, रा. साळवण, तिवडे, ता. गगनबावडा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, बुधवारी मध्यरात्री ते शेतवडी परिसरात गंभीर जखमी अवस्थेत आढळले होते. स्थानिकांनी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार ही पूर्वनियोजित हत्या असल्याचे दिसत असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि पुराव्यांच्या आधारे मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id