SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

ज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

schedule04 Aug 26 person by visibility 287 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक पटलावर सुवर्णअक्षर कोरणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (दादा) यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी कोल्हापुरातील 'ज्ञानशांती' निवासस्थानी मंगळवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणारे एक महान पर्व संपले आहे.
तळागाळातून राजकीय प्रवास सुरू करणारे डी. वाय. पाटील १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या निष्ठावंत सेवेची दखल घेऊन नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी बिहार आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची धुराही समर्थपणे सांभाळली.

महाराष्ट्रात तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचे खासगीकरण करून ते सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान अग्रगण्य राहिले. १९८३ मध्ये नवी मुंबईत पहिली अभियांत्रिकी संस्था स्थापन करून त्यांनी शैक्षणिक साम्राज्याची रोवणी केली. आज त्यांच्या डी. वाय. पाटील समूहाअंतर्गत पुणे, पिंपरी, नवी मुंबई आणि कोल्हापुरात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषीसह अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था कार्यरत आहेत.

शिक्षणाइतकीच आरोग्य व क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोलाची भर घातली. नवी मुंबई, पुणे व कोल्हापुरात सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल्सद्वारे गरजूंना मोफत आरोग्यसेवा दिली, तसेच जागतिक दर्जाचे 'डी. वाय. पाटील स्टेडियम' उभारले. १९९१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शेगावच्या श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या त्यांच्या निधनाने एका महान ज्ञानतपस्वीला महाराष्ट्राने मुकले आहे.

◼️ पद्मश्री डॉ.डी. वाय.पाटील (दादा) यांचे निधन 

◼️अंत्यदर्शन :

▪️बुधवारी

सकाळी 9 ते सायंकाळी 4 

यशवंत निवास ,कसबा बावडा येथे

▪️अंत्ययात्रा
सायंकाळी 4 वाजता
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा बावडा येथून निघणार आहे

▪️अंत्यसंस्कार
सायंकाळी 5 वाजता पॅव्हेलियन ग्राऊंड कसबा बावडा, कोल्हापूर

 

◼️अंत्ययात्रा सायंकाळी 4 वाजता डी वाय पाटील मेडीकल कॉलेज, लाईन बाझार, कसबा बावडा येथून...

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id