SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

विनापरवाना रुग्णालय, सोनोग्राफी मशीन व गर्भपात प्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्यावर कारवाई

schedule04 Aug 26 person by visibility 108 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरात गर्भलिंग निदान करून बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांना छाप्यात पकडण्यात आले आहे.  महानगरपालिकेच्या नोंदीनुसार, डॉ. गायकवाड यांनी सन २०२० मध्ये कदमवाडी रोड येथील प्रतिमा हॉस्पिटलची नर्सिंग होम ॲक्टअंतर्गत नोंदणी केली होती. या नोंदणीची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपुष्टात आली होती. त्यानंतर परवान्याचे नूतनीकरण न केल्याने महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावली होती.

  यावेळी डॉ.चंद्रकांत गायकवाड यांनी रुग्णालय बंद असल्याचे लेखी स्वरूपात लिहून दिले आणि तेथे रहात होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केली असता तेथे कोणताही रुग्ण दाखल नसल्याचे, तपासणी विभाग बंद असल्याचे, रुग्णालयात बेड किंवा कर्मचारी कार्यरत नसल्याचे तसेच बाह्यरुग्ण व आंतररुग्ण नोंदवहीत कोणत्याही रुग्णांच्या नोंदी नसल्याचे आढळून आले. या अहवालाच्या आधारे रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यात आली होती. सध्या संबंधित ठिकाणी आढळून आलेले सोनोग्राफी मशीन हे पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत नसल्याचे तसेच गर्भपात केंद्र चालविण्यासाठी आवश्यक परवानाही घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या पोलिस यंत्रणेमार्फत सुरू असून तपासाअंती विनापरवाना रुग्णालय चालविणे, विनापरवाना सोनोग्राफी मशीन बाळगणे तसेच आवश्यक नोंदणी व परवान्याविना गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्याविरुद्ध आरोग्य विभागामार्फत नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id