SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

schedule03 Feb 26 person by visibility 253 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज राजारामपूरी 1 ते 13 गल्ली, सायबर चौक ते एनसीसी भवन या ठिकाणी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईवेळी 3 हातगाडया, स्टँण्ड बोर्ड 9, लाकडी व लोखंडी टेबल 03, तसेच 22 खुर्च्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या  कारवाई वेळी काही हातगाडया मालकांनी स्वता:हून आपल्या हातगाडया काढून घेतल्या.

मा.उच्च न्यायालय, मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर यांचेकडे दाखल असले कोल्हापूर शहरातील रस्त्याचा दर्जा, अतिक्रमण बाबत जनहित याचिका क्रमांक 91/2025 दि.22 जानेवारी 2026 रोजीचे आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागामार्फत हि कारवाई करण्यात आली. 

सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उप-शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विभागीय कार्यालय क्र.3 कडील कर्मचा-यांच्या पथकाकडून संयुक्तीक करण्यात आली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id