SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात मित्राकडून मित्राच्या डोक्यात दगड घालून निघृण खून

schedule04 Jan 26 person by visibility 304 categoryगुन्हे

कोल्हापूर : विक्रमनगर परिसरातील दारू अड्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत आईवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून चिडून मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.विकास दत्तात्रय भोसले (वय ३३, रा. येल्लूर, ता. शाहूवाडी, सध्या रा. विक्रमनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आरोपी ओंकार महादेव काळे (वय २५, रा. शाहू कॉलनी, तिसरी गल्ली विक्रमनगर, कोल्हापूर) याला रात्री उशिरा अटक केली.

 विकास हा मूळचा शाहूवाडी तालुक्यातील होता. कामानिमित्त कोल्हापुरात होता. त्याची विक्रमनगर परिसरातील ओंकार काळे याच्यासोबत मैत्री होती.  शनिवारी दिवसभरही ते एकत्र होते. रात्री दारू पिण्यासाठी ते जोशी गल्ली परिसरात गेले. त्या ठिकाणी काही वेळ गप्पाही मारल्या. त्यानंतर बोलण्याच्या कारणावरून दोघांत वाद झाला.


ओंकारने शिवीगाळ करत विकास याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने दारूच्या नशेत त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे विकास हा गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांना त्याला जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी ओंकार काळेला  अटक केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id