SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

घरफोडी करणारा आरोपी जेरबंद, 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस

schedule06 Feb 26 person by visibility 302 categoryगुन्हे

कोल्हापूर  : घरफोडी करणाऱ्या आरोपी अटक करण्यात आली. त्याच्याकडून करवीर पोलीस ठाण्यात दाखल झालेले एकूण 14 घरफोडीचे गुन्हे  उघडकीस आले. 230.190 ग्रॅम सोने, 3 किलो चांदी व इतर साहित्य असा एकूण 44,68,050/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली .

तपास पथकातील पोलीस अमंलदार दिपक घोरपडे व प्रविण पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली. मिळाले माहितीचे आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अरविंद पाटील, सतिश सुर्यवंशी अशा पथकाने दि.27.01.2026 रोजी उजळाईवाडी गांवचे हद्दीत भारती विद्यापीठ कडून हायवे रोडवर येणारे कॉर्नरजवळ सापळा लावून आरोपी  प्रताप सुरेश कदम, वय 31, रा. शिवाजी चौक कासारवाडी, शिरोली एम.आय.डी.सी. ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर सध्या रा. नक्षत्र पार्क शिक्षक कॉलनी पाचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर यास त्याचे कब्जातील 3,00,000/-रुपये किंमतीचे 20 ग्रॅमचे सोन्याचे दागीन्यासह पकडले.

 करवीर पोलीस ठाणे, गु.र.नं. 693/2025, बी. एन. एस. 331 (3), 331 (4),305 (अ) प्रमाणे दाखल गुन्हा तपासाकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे घेवून आरोपी प्रताप सुरेश कदम यास नमुद गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपास केला. तपासात त्याने गेले दोन वर्षापासून कोल्हापूर शहरालगत असले उपनगरात रात्रौंचे वेळी घरफोडी-चोरीचे गुन्हे केलेचे निष्पन्न झाले. नमुद आरोपी हाशिरोली एम.आय.डी.सी. येथील राहणारा आहे परंतू तो गेले तीन वर्षापासून पाचगांव, ता. करवीर परिसरात भाडयाने राहत आहे. आरोपी हा कोणताही कामधंदा करीत नाही परंतू शहरालगत असले उपनगरात राहणेस असलेने त्याने राहत असले परीसरात आसपासचे परीसरात रात्रौचे वेळी पायी चालत जावून बंद असलेली घरे लक्ष्य करुन घरफोडी चो-या केलेचे निष्पन्न झाले आहे. आरोपी प्रताप सुरेश कदम याचेकडून आज तपासामध्ये 230.190 ग्रॅम सोन्याचे व 3 किलो चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण 44,68,050/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केला आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक,  योगेश कुमार , व  अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी. धिरजकुमार,  उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अरविंद पाटील, सतिश सुर्यवंशी यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id