SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

पेपरफुटी विरोधात कोल्हापुरात आज शनिवारी काँग्रेसचे धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च

schedule25 Jul 26 person by visibility 331 categoryराजकीय

🟣राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

​कोल्हापूर: देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारच्या दुर्लक्षा विरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शनिवारी (२५ जुलै) कोल्हापुरात भव्य धरणे आंदोलन व कँडल मार्च आयोजित करण्यात आला आहे. ​अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे राज्यव्यापी आंदोलन छेडले जात आहे. ​कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामध्ये राजाराम गार्डन जनता बाझार चौक राजारामपुरी येथे सायंकाळी ५:०० ते ७:०० या वेळेत हे आंदोलन होणार आहे. ​​सायंकाळी ५ ते ६ या दरम्यान राजाराम गार्डन जनता बाझार चौक राजारामपुरी येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल.

​सायंकाळी ६ ते ७ या वेळेत राजाराम गार्डन येथून 'आईचा पुतळा' मार्गे सायबर कॉलेज पर्यंत कँडल मार्च काढण्यात येईल. या आंदोलनात खासदार शाहू छत्रपति, काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, गणपतराव पाटील, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, शशांक बावचकर, संजय कांबळे, तौफिक मुल्लाण्णी, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, महिला, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, एनएसयूआयचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहणार आहेत. 

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सरकारला जागा करण्यासाठी कोल्हापुरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, तरुण आणि पालकांनी या धरणे आंदोलन व कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id