सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
schedule31 Jan 26 person by visibility 301 categoryराजकीय
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाने सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली.
या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. त्यानंतर अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.