SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

सुळकुड दुर्घटनेतील मृत शर्विलच्या घरी मंत्री हसन मुश्रीफ यांचे सांत्वन; फाऊंडेशनकडून ५१ हजारांची आर्थिक मदत

schedule03 Aug 26 person by visibility 284 categoryसामाजिक

▪️गलथानपणाबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
       
सुळकुड : सुळकुड ता. कागल येथील श्रीकृष्ण तरुण मंडळ गल्लीतील शर्विल सागर महादेव या ९ वर्ष वयाच्या बालकाचा खेळताना विजेच्या ११ केव्ही उच्च दाब क्षमतेच्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. काल रविवारी दि. 2  ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज  शर्विलच्या घरी सांत्वनपर भेट दिली. या भेटीत त्यांनी नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने महादेव कुटुंबियांना रू. ५१ हजार रुपयांचा तातडीच्या मदतीचा धनादेश दिला. मुश्रीफ या कुटुंबीयांच्या घरी पोहोचताच कु. शर्विलच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. कुटुंबीयांच्या या आक्रोशाने मंत्री  मुश्रीफही भावनाविवश झाले व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
​          
याबाबत अधिक माहिती अशी, येथील श्रीकृष्ण गल्लीतून ११ केव्ही उच्चदाब क्षमतेची तार महावितरणने उघड्यावरच ठेवलेली आहे. कुमार जीवन शिक्षण विद्यामंदिरात इयत्ता चौथीत शिकत असलेला नऊ वर्षाचा  शर्विल आणि त्याचे सवंगडी एका इमारतीवर लपंडाव खेळत होते. खेळतानाच   शर्विलचा या उच्च दाब क्षमतेच्या तारेला स्पर्श झाला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यामागे आई- वडील, बहीण व आजोबा असा परिवार आहे.
        
यावेळी महादेव कुटुंबीय व ग्रामस्थांशी बोलताना मंत्री  मुश्रीफ यांनी सांगितले की, या प्रकरणी निष्काळजीपणा व गलथानमध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करू आणि महादेव कुटुंबीयांना जास्तीत- जास्त मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करू. 
           
◼️दोषींवर कठोर कारवाई करा - संतप्त ग्रामस्थांची मागणी
येथील श्रीकृष्ण तरुण मंडळ गल्लीत ११  के. व्ही.  उच्च दाब क्षमतेची तार महावितरणने उघड्यावरच सोडलेली आहे. मंत्री  मुश्रीफ यांनी भेट देताच महावितरणच्या या गलथान आणि जीवघेण्या कारभाराबद्दल ग्रामस्थांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी  मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी  मुश्रीफ यांनी महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी प्रयत्न करू असे स्पष्ट केले. तसेच; तहसीलदार  अमरदीप वाकडे व महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या व जास्तीत- जास्त भरपाई या कुटुंबीयांना देण्याच्या सूचना केल्या.
        
यावेळी क्रांतीकुमार पाटील, गोटू देशपांडे, भीमगोंडा पाटील, नितीन कांबळे, सुरेश घाटे, सुधीर महादेव, अनिल महादेव आदी प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id