SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

मानवी विचारशक्तीला तंत्रज्ञान हा पर्याय नाही : प्रा. पर्सी इंजिनिअर; ‘रिसेंट ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ

schedule06 Feb 26 person by visibility 241 categoryशैक्षणिक

▪️डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजन

कोल्हापूर  : तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढते; मात्र मानवी मेंदूची म्हणजेच विचार करण्या क्षमतेची जागा  तंत्रज्ञान कधीही घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक विद्यापीठ, सुरतचे माजी प्रो-व्होस्ट प्रा. पर्सी इंजिनिअर यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता  हे आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञान असले तरी ते केवळ एक साधन असून त्याचा वापर विचारपूर्वक आणि जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात या परिषदेचे उद्घाटन झाले.

यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू तथा डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, युनायटेड किंगडममधील टीसाईड युनिव्हर्सिटी प्रा. मायकेल शॉर्ट, पब्लिक युनिवर्सिटी मलेशियाच्या डॉ. कलावानी चेल्लप्पन, टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाऊन, कोलकाताचे प्रा. निलांजन डे यांच्यासह डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, समन्वयक डॉ. मनीषा भानुसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेत देश-विदेशातून 553 रिसर्च पेपर सबमिट झाले होते. त्यातील 175 रिसर्च पेपर या परिषदेत मांडले जाणार आहेत.

प्रा. पर्सी इंजिनिअर पुढे म्हणाले की, अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती ही सतत शिकत असते. काळानुसार, समाजाच्या गरजेनुसार आणि तांत्रिक प्रगतीनुसार अभियांत्रिकीतील ट्रेंड्स बदलत राहतात. ए. आय.  स्वतःहून स्वतंत्र विचार करू शकत नाही; त्यामुळे मानवी सर्जनशीलता, निर्णयक्षमता आणि नैतिक मूल्ये केंद्रस्थानी ठेवूनच तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. ए.के. गुप्ता  म्हणाले, संशोधन हा अभियांत्रिकी क्षेत्राचा पाया आहे. विद्यापीठ अनुदान आयोग व अन्य प्राधिकरणाच्या नियमांमुळे संशोधन पेपर्स प्रसिद्ध करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढते संशोधन हे कौतुकास्पद आहे. मात्र हे संशोधन केवळ शोधनिबंध अथवा प्रयोगशाळेत पुरतेच मर्यादित राहू नये. आपण केलेल्या संशोधनाचा फायदा समाजाला झाला, त्यामुळे जीवनमान उंचावले तरच ते अभियांत्रिकी आणि संशोधक यांचे खरे यश ठरेल. 

प्रा. मायकेल शॉर्ट यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत अभियांत्रिकीतील नवकल्पना या विषयावर मार्गदर्शन करताना पर्यावरणपूरक व टिकाऊ तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला.

प्रा. निलांजन डे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग अभियांत्रिकी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी कसा करता येईल, यावर प्रकाश टाकला. ए. आय. मुळे निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान व अचूक होऊ शकते. मात्र मानवी सर्जनशीलता आणि नैतिक मूल्ये केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शनिवारी डॉ. कलावानी चेल्लप्पन यांचे मार्गदर्शन होणार असून त्याचबरोबर विविध विषयांवरील पेपर्सचे प्रेझेन्टेशन होणार आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील अलीकडील ट्रेंड्सवर यावेळी सविस्तर मांडणी केली जाणर आहे. 

डॉ. राधिका ढणाल व प्रा. तिलोत्तमा पाडळे यांनी सूत्रसंचालन केले. या परिषदेला विविध विद्यापीठे, महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त आणि शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id