SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

कालसुसंगत अभ्यासक्रम ,शैक्षणिक गुणवत्तेची हमी; विद्यार्थ्यांची केआयटीला प्रथम पसंती

schedule03 Aug 26 person by visibility 309 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : उद्योगजगताच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रमामध्ये सातत्याने सुधारणा, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती, जागतिक दर्जाच्या इंटर्नशिपच्या संधी आणि उत्कृष्ट प्लेसमेंटच्या माध्यमातून केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर (प्रदत्त स्वायत्त) यंदाच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतही विद्यार्थ्यांच्या पसंतीचे केंद्र ठरले आहे. यावर्षी इतर विभागांप्रमाणेच सिव्हिल,इलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकलसारख्या कोअर ब्रँचेसमध्येही केआयटीचा कट-ऑफ वाढला आहे.


गेल्या ४३ वर्षांपासून अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण वाटचाल करणाऱ्या केआयटीने उद्योगक्षेत्राशी समन्वय साधत अभ्यासक्रमामध्ये केलेले आवश्यक बदल,कौशल्याधारित शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच देश-विदेशातील नामांकित विद्यापीठे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उपलब्ध होणाऱ्या इंटर्नशिपच्या संधी यामुळे विद्यार्थ्यांनी केआयटीला प्राधान्य दिले असल्याचे संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली म्हणाले, “केआयटीची गुणवत्ता ही येथील प्राध्यापक, कर्मचारी आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतील टीमने सातत्याने केलेल्या गुणवत्तापूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. उद्योगजगताशी कायम सुसंवाद ठेवून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, रोजगारक्षम आणि भविष्याभिमुख शिक्षण देण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे.”

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत केआयटीमध्ये प्रथम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यामध्ये वैष्णवी बागल-सिव्हील,मधुरा साळुंखे- मेकॅनिकल आणि युवराज हरेर-इलेक्ट्रीकल या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले. प्रवेश प्रक्रियेत केआयटीवर विश्वास दाखविल्याबद्दल सर्व विद्यार्थी व पालकांचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. साजिद हुदली यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि उत्कृष्ट करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याचा केआयटीचा संकल्प यापुढेही कायम राहील, असा विश्वास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन, सचिव श्री. दीपक चौगुले तसेच इतर विश्वस्तांनी व्यक्त केला. यावेळी प्रवेश विभागाचे अधिष्ठाता डॉ. महेश शिंदे आणि सह-अधिष्ठाता प्रा. अमर टिकोळे, रजिस्ट्रार डॉ. दत्तात्रय साठे, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. मंजुनाथ हुदगी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id