SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

कोल्हापुरात लक्ष्मीपुरी येथे कलापुरीतर्फे रविवारी कलादालनाचे लोकार्पण

schedule31 Jul 26 person by visibility 323 categoryउद्योग

🟣 ग्रामिण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ कलापुरीचे कलादालन करवीरवासीयांच्या सेवेत रुजू

कोल्हापूर : कोल्हापूरकर आणि कोल्हापुरात येणारे भाविक यांची गरज लक्षात घेवून कलापुरी मार्फत कोल्हापुरात लक्ष्मीपूरी येथे कलादालन सुरू करण्यात आले आहे. रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी या कलादालनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कोल्हापूरचा वारसा असणाऱ्या या हस्तनिर्मित वस्तूंच्या अशा प्रकारच्या पहिल्याच कलादालनास भेट देवून या कलाकृती बनविणाऱ्या महिला कारागिरांच्या कलेस करवीरवासीयांनी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन कलापुरीच्या संस्थापिका  अपर्णा चव्हाण आणि प्रा. श्रीधर वैद्य यांनी पत्रकार परिषदेत केले.

 अपर्णा चव्हाण व  आतिश चव्हाण यांनी सुरु केलेल्या व केवळ हस्तकला क्षेत्रासाठी समर्पित कलापुरी या कोल्हापुरातील स्टार्टअपने अल्पावधीमध्येच देश विदेशात नावलौकिक कमावला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणाच्या उ‌द्देशाने सुरु करण्यात आलेल्या कलापुरीच्या माध्यमातून आज ५०० हून अधिक ग्रामीण महिलांना रोजगार प्राप्त झालेला आहे. ग्रामीण कारागीरांच्या हस्तकौशाल्यातून साकारलेल्या कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी ज्वेलरी व हँडमेड बास्केट या सारख्या उत्पादनांना कलापुरीच्या माध्यमातून आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. ग्रामिण भागातील कारागिरांना विशेषतः महिला कारागिरांना कौशल्याधारीत रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण देणे, ह्या कारागिराना आवश्यक ती सर्व टुल्स व कच्चा माल उपलब्ध करून देणे, कारागिरांनी बविलेल्या हस्तकलेच्या सर्व वस्तूंना देशात व विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देणे व ह्या माध्यमातून स्वयंपूर्ण खेडी व ग्रामस्वराज्य हे महात्मा गांधींचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे कार्य गेल्या १० वर्षांहून अधिक काळ कलापुरी करीत आहे.

 कलापुरीच्या या कार्याची दखल घेवून नुकताच महाराष्ट्र शासनाने कलपुरीचा हस्तकला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याब‌द्दल पुरस्कार देवून गौरव केला आहे. मोरेवाडी  येथे कलापुरीचे कोल्हापुरी चप्पल युनिट, यळगुड ता. हातकणंगले येथे पारंपारिक दागिन्यांचे यूनिट व सोनी ता. मिरज येथे हँडमेड बास्केट युनिटच्या माध्यमातून ग्रामिण भागातील ५०० हून अधिक महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी कलापुरीने उपलब्ध करून दिली आहे. आज पर्यंत ग्रामिण भागातील महिला कारागिरांनी बनविलेल्या कलाकृतींना ऑन लाईन मार्केटिंगच्या माध्यमातून कलापुरीने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.

आज कोल्हापूर हे एक फार मोठे टुरिस्ट हब बनले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले टुरिस्ट खात्रीशीर कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक महाराष्ट्रियन ज्वेलरी आणि हॅडमेड बास्केट कुठे मिळतील याचा शोध घेत असतात. कलापुरीला आज पर्यंत साथ देणारे
कोल्हापूरकर आणि कोल्हापुरात येणारे भाविक यांची गरज लक्षात घेवून कलापुरीमार्फत कोल्हापुरात लक्ष्मीपूरी येथे कलादालन सुरू करण्यात आले आहे.

या कलादालनात जी.आय. मान्यताप्राप्त कारागिरांनी बनविलेल्या आरामदाई व विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ असे नानाविध मनमोहक पारंपरिक दागिने आणि दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त अशा हँडमेड बास्केटस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्रामिण भागातील महिलांनी बनविलेल्या ह्या हस्तनिर्मित वस्तूंना ह्या कलादालनाच्या माध्यमातून करवीरवासियांसमोर प्रदर्शित करायची संधि मिळाली आहे. रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी या कलादालनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कोल्हापूरचा वारसा असणाऱ्या या हस्तनिर्मित वस्तूंच्या अशा प्रकारच्या पहिल्याच कलादालनास भेट देवून या कलाकृती बनविणाऱ्या महिला कारागिरांच्या कलेस करवीरवासीयांनी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन कलापुरीच्या संस्थापिका  अपर्णा चव्हाण यांनी केले आहे. कलापुरी कलादालनाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्य प्रत्येक खरेदीवर भरघोस सूट व एक विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहे असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.

◼️कलापुरीशी जोडले गेलेल्या कारागिरांनी बनविलेल्या नावीन्यपूर्ण कलाकृतींना आज पर्यंत ऑन लाईन मार्केटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचे काम कलापुरीने केले आहे. आता कलापुरी कलादालनाच्या माध्यमातून या  कारागिरांची कला आम्ही करवीरवासीयांच्या समोर आणत आहोत. कलापुरीच्या या उपक्रमास देखील कोल्हापूरकर आणि कोल्हापुरात येणारे भाविक भरभरून प्रतिसाद देतील असा आम्हांस विश्वास आहे.
▪️ आतिष चव्हाण, संस्थापक, कलापुरी

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id