SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

लोकशाहीचा कौल काँग्रेसच्या बाजूने; सभागृहात काँग्रेसचा आवाज बुलंद ठेवा : आमदार सतेज पाटील

schedule06 Feb 26 person by visibility 219 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आज अजिंक्यतारा कार्यालयात पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करत, लोकशाहीमध्ये जनतेने काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिला असून सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी ही ताकद दाखवण्याचं आवाहन केलं.


गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक आज सकाळी अजिंक्यतारा कार्यालयात बोलावण्यात आली होती.

बैठकीत बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, महापौर निवडीसाठी काँग्रेसला बिनविरोध प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र जनतेने काँग्रेसला सर्वाधिक जागा देत मोठा पक्ष म्हणून निवडून दिलं आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत सभागृहात आपलं अस्तित्व ठामपणे मांडणं गरजेचं आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधक म्हणून एकत्रितपणे संघर्ष करा, सभागृहात पार्टी स्पिरीट दाखवा आणि सकारात्मक भूमिका घ्या, अशा नगरसेवकांना सूचना दिल्या.

सत्ताधाऱ्यांनी मनमानी निर्णय घेऊ नयेत, यासाठी सक्षम विरोधकाची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद करत, निधी फक्त सत्ताधारी नगरसेवकांनाच मिळू शकत नाही. काँग्रेसकडे मोठी संख्याबळ असल्यामुळे सत्ताधाऱ्यांना आमची दखल घ्यावीच लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्रातील राजकारणाचा संदर्भ देताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, संसदेत विरोधकांची संख्या सुमारे दोनशेच्या आसपास असून आमच्यात एकजूट असल्यामुळे पंतप्रधान अनेकदा संसदेत यायला टाळतात. हीच भूमिका महापालिकेतही काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधक म्हणून घ्यावी, असं त्यांनी सांगितलं.

बैठकीला आमदार जयंत आसंगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी, बाळासाहेब सरनाईक, सरलाताई पाटील, गटनेते नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, राजू लाटकर, संजय मोहिते यांच्यासह काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id