SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहीम सुरू

schedule05 Feb 26 person by visibility 160 categoryसामाजिक

  कोल्हापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहीमेची सुरुवात झाली असून ही मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या पंधरवड्यात राबिवण्यात येत आहे.

  समाजातील सर्व नवीन कुष्ठरुण शोधून त्या सर्व रुग्णांना नियमित व पूर्ण उपचार देऊन समाजातील संसर्गाची साखळी तुटल्यास समाजातील कुष्ठरुग्णांचा भार कमी होईल. याकरिता अतिसंवेदनशील भागामध्ये कुमुम शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

  मोहिमेसाठी कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सांगली जिल्ह्यामध्ये कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहीमेअंतर्गत विशेष पथके तयार करण्यात आली असून, पथकामध्ये आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. पथकांद्वारे ग्रामीण, शहरी भागांमध्ये सर्व व्यक्तींची कुष्ठरोग विषयक शारीरिक तपासणी करण्यात येत असून नागरिकांनी तपासणी पथकास सहकार्य करून स्वतः ची तपसणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले.

  🔹️कुसुम शोध मोहिमेअंतर्गत जिल्हानिहाय संवेदनशील ठिकाणे व कार्यरत पथके पुढीलप्रमाणे:-
  ▪️कोल्हापूर- एकूण संवेदनशील ठिकाणे 587, एकूण कार्यरत पथके 448.
  ▪️सांगली - एकूण संवेदनशील ठिकाणे 765, एकूण कार्यरत पथके 467.
  ▪️सिंधुदुर्ग - एकूण संवेदनशील ठिकाणे 559, एकूण कार्यरत पथके 111 .
  ▪️रत्नागिरी - संवेदनशील ठिकाणे 769 तर एकूण कार्यरत पथके 474 पथके कार्यरत राहणार आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id