SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

महाडायलिसिस सेवेमुळे किडनी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार : आमदार यड्रावकर; शिरोळ ग्रामीण रुग्णालयात महाडायलिसिस सेवा सुरू

schedule03 Aug 26 person by visibility 256 categoryआरोग्य

शिरोळ : रुग्णांना उपचारासाठी तालुक्याबाहेर हेलपाटे मारावे लागू नयेत, दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या दारातच उपलब्ध व्हाव्यात, हा माझा कायम प्रयत्न राहिला आहे. महाडायलिसिस सेवा सुरू झाल्याने शिरोळ तालुक्यातील किडनी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सेवेत हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि एच.एल.एल. लाईफकेअर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या मोफत महाडायलिसिस सेवेच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.या महत्त्वपूर्ण आरोग्य सेवेचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले की, राज्य शासनाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्या लक्षात घेऊन ग्रामीण भागातच आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. शिरोळ तालुका भविष्यात 'मेडिकल हब' म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कुरुंदवाड येथे स्वतंत्र महिला रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि इतर आरोग्यविषयक प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेत असून, त्याचा लाभ संपूर्ण तालुक्याला होणार आहे.

महाडायलिसिस सेवा सुरू झाल्यामुळे आतापर्यंत डायलिसिससाठी कोल्हापूर, सांगली किंवा मिरज येथे जावे लागणाऱ्या रुग्णांचा वेळ, खर्च आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही मोफत सेवा जीवनदायी ठरणार आहे. स्थानिक स्तरावरच आधुनिक यंत्रणेद्वारे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार मिळणार असल्याने रुग्णांचा आत्मविश्वास वाढणार असून त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा आधार मिळणार आहे.

 यावेळी पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, शिरोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, उपसभापती मनीषा कदम, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगेचे व्हा चेअरमन बाबा पाटील, पंचायत समिती सदस्य फजलेअली पटेल, विजयसिंह देशमुख, सुरज कांबळे, शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. निशिकांत प्रचंडराव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आभार ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id