SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय चालवणारा मुख्य फरार आरोपी करवीर पोलिसांच्या जाळ्यात

schedule02 Aug 26 person by visibility 383 categoryगुन्हे

कोल्हापूर: व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्याद्वारे हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या आणि गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस करवीर पोलिसांनी जेरबंद केले आहे. शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील (रा. कोल्हापूर) असे या मुख्य आरापीचे नाव आहे.

करवीर पोलीस ठाण्यात याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने "सागर पाटील फ्रेंड सर्कल" या नावाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपवर वेश्याव्यवसायाकरिता आणलेल्या पीडित महिलांचे फोटो पाठवून कोल्हापुरातील पांढरपेशा व्यक्तींना भुरळ घातली जात असे. याद्वारे वाशी (ता. करवीर) येथील सनराईज लॉजमध्ये कुंटणखाना चालवला जात होता, ज्यावर यापूर्वी करवीर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाईपासून मुख्य आरोपी शहाजी वैद्य हा सतत फरार होता.

व्हॉट्सॲप द्वारे वेश्याव्यवसाय चालवणारा शहाजी वैद्य हा जीवबा नाना पार्क येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक  रवींद्र कळमकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ रवाना केले. पोलिसांनी सापळा रचून हवा असलेला आरोपी शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याला जीवबा नाना जाधव पार्क येथून ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. "सागर पाटील फ्रेंड सर्कल" या व्हॉट्सॲप ग्रुपमधील सदस्यांशी संपर्क साधून, सुहास निचीते आणि विक्रम दिनकर कांबळे यांच्या मदतीने तो ग्राहकांना सनराईज लॉजमध्ये बोलावून घेत असे. तसेच येणाऱ्या ग्राहकांकडून कॅश किंवा ऑनलाइन स्वरूपात पैसे स्वीकारून हा हायप्रोफाइल व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती त्याने दिली.

सदरची धडक कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक  अण्णसाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी  अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  रवींद्र कळमकर, पोलीस हवालदार विजय तळसकर, रणजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश कांबळे, श्रीधर जाधव आणि गुन्हे शोध पथकातील इतर अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

आरोपीस दिनांक ०३ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात येणार असून, या गुन्ह्याशी संबंधित इतर आरोपींवरही कठोर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id