SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

"दुर्गम,आदिवासी, ग्रामीण आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशनाद्वारे, पारदर्शक पद्धतीने पदोन्नती करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय"

schedule20 Dec 25 person by visibility 354 categoryआरोग्य

मुंबई : राज्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात गट "ब" संवर्गात कार्यरत असलेल्या 190 वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट "अ" संवर्गात रिक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. 

 आरोग्य विभागाने अत्यंत पारदर्शीपणे, समुपदेशनाद्वारे, वैद्यकीय अधिकारी यांचे पसंती क्रमानुसार, राज्यातील 190 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती कोठ्यातील रिक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे वरिष्ठ पदावरील रिक्त जागा तात्काळ भरल्या जाणार असुन,  प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर सर्व रुग्णालयातील कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. विशेषतः आदिवासी दुर्गम व ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होईल. या निर्णयामुळे दीर्घकाळ पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले असुन, वैद्यकीय सेवेवरही त्याचे सकारात्मक परिणाम होतील अशी अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-ब मध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी (वेतनस्तर एस-१६: ₹४४९००-१४२४००), यांना महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी (वेतनस्तर एस-२०: ₹५६१००-१७७५००), या संवर्गात स्वरूपात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असून, शासन निर्णयातील अटी व शर्तींच्या अधीन राहून  वैद्यकीय अधिकाऱ्यांना नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

आरोग्य मंत्री  प्रकाश आबिटकर यांनी समुपदेशनाद्वारे पदोन्नती देण्याबाबत घेतलेल्या पारदर्शी व सकारात्मक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकारी संवर्गातून समाधान व्यक्त होत असुन,  आरोग्य विभागातील एक महत्त्वाचा प्रशासकीय प्रश्न मार्गी लागला आहे.  विशेषत: दुर्गम, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले  जाते.

 आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव दी. नी. केंद्रे,  आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अवर सचिव वसंत गायकवाड, सहसंचालक राजेंद्र भालेराव, मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांचे मार्गदर्शनाखाली समुपदेशन प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id