SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

schedule05 Feb 26 person by visibility 232 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय, कसबा बावडा येथे  शुक्रवार ६ फेब्रुवारी पासून दोन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेत संगणक अभियांत्रिकी, विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, सिव्हिल व पर्यावरण अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, केमिकल इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आदी विविध अभियांत्रिकी शाखांतील नवीन संशोधन प्रवाह, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा होणार आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील मुख्य अतिथी असून डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील  आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि  डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता कुलगुरू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या परिषदेत अमेरिका, युनायटेड किंगडम, मलेशिया आणि देशभरातील वक्ते सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रा. पर्सी इंजिनिअर (सार्वजनिक विद्यापीठ, सुरत), प्रा. मायकेल जॉन (टीसाईड युनिव्हर्सिटी, युनायटेड किंगडम), डॉ. कलावानी चेल्लप्पन ( युनिवर्सिटी केबंग्सन, मलेशिया) व प्रा. निलांजन डे (टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाऊन, कोलकाता) यांचा समावेश आहे.

सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात या परिषदेचे उद्घाटन होणार असून मार्गदर्शन व चर्चासत्रे महाविद्यालयात होणार आहेत.  संशोधकांना स्कोपस डिजिटल लायब्ररी मध्ये प्रकाशनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

डॉ. मनिषा भानुसे, संयोजक व समन्वयक म्हणून काम पाहत असून प्राचार्य डॉ एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id