SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

पश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस सर्वाधिक प्रवेश जागा

schedule03 Aug 26 person by visibility 326 categoryशैक्षणिक

◼️पश्चिम महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये अव्वल; विद्यार्थी-पालकांची प्रथम पसंती

वारणानगर  : यंदाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत पश्चिम महाराष्ट्रातील, नामांकित विद्यापीठाशी संलग्न जुन्या महाविद्यालयापेक्षा तसेच तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयापेक्षा,  वारणा विद्यापीठाच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (कोरे अभियांत्रिकी), वारणानगर यास सर्वाधिक ११०२ प्रवेश जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची प्रथम पसंती पुन्हा एकदा कोरे अभियांत्रिकीला मिळाल्याचे सिद्ध झाले आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालय परिसरात विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती. मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, टीसीएस प्रायोजित कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम्स (CSBS) तसेच सायबर सिक्युरिटी या शाखांमध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

याप्रसंगी प्राचार्य, डॉ. के. आय.पाटील, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, ॲडमिशन इन्चार्ज डॉ. ए. व्ही. पाटील, प्रा. राहुल कुंभार, जालिंदर जाधव, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या उल्लेखनीय यशाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील तसेच वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उत्कृष्ट प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात असून, उद्योगजगताच्या गरजांनुसार सक्षम, कौशल्यसंपन्न आणि गुणवंत अभियंते घडविण्याचे ध्येय महाविद्यालयाने कायम ठेवले आहे.

महाविद्यालयाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ६५० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होत असते. महाविद्यालयाला दोन वेळा एनबीए मानांकन, नॅक 'अ' श्रेणी, उद्योगाभिमुख इंडस्ट्री रेडी प्रोग्रॅम, बी.टेक ऑनर्स अभ्यासक्रम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक वसतिगृहे, उत्कृष्ट दळणवळण सुविधा, उच्चांकी प्लेसमेंट, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार, स्पर्धा परीक्षा केंद्र, इनडोअर स्टेडियम, सेमी ऑलिम्पिक जलतरण तलाव तसेच वारणा विज्ञान केंद्र यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, तांत्रिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याने कोरे अभियांत्रिकी हे पश्चिम महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचे अग्रगण्य केंद्र म्हणून ओळखले जाते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id