SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

तरुणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे न्यावे : मंत्री हसन मुश्रीफ

schedule02 Aug 26 person by visibility 266 categoryसामाजिक

◼️लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना कागलमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन
              
कागल : तरुणाई ही सळसळत्या रक्ताची असते. तरुणाईने पेटून उठण्याची गरज आहे. इतिहास घडवायचा असेल तर तरुणाच लागतात, त्याशिवाय कुठल्याही देशाचा इतिहासच घडू शकत नाही. तरूणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे न्यावे, असे आवाहन मंत्री  हसन मुश्रीफ यांनी केले.
       
कागलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री  मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
                  
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, अण्णाभाऊ अवघ्या दीड दिवसांच्या वर शाळेतच गेले नाहीत. अण्णाभाऊंनी मुंबईतील दुकानांच्या पाट्या वाचत- वाचत अक्षर ओळख करून घेतली. ते महान सत्यशोधक साहित्यरत्न होते. ते कम्युनिस्ट विचारांचे होते. त्यांचे कार्य चळवळीचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर होता, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते गुरु मानत होते. गरिबांबद्दल, दलितांबद्दल त्यांना प्रचंड कळवळा होता.
             
◼️दीड दिवसांची शाळा आणि विपुल साहित्यसंपदा......!
मुश्रीफ म्हणाले,  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वडील गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांच्या चाळीत राहणारे अण्णाभाऊ अवघे दीड दिवसच शाळेत गेले. तरीसुद्धा त्यांनी किती मोठे पोवाडे, किती मोठ्या कादंबऱ्या, पटकथा, लघुकथा अशी विपुल साहित्यसंपदा लिहिली. त्यांनी साहित्यातही एक आदर्श निर्माण केला. ब्रिटिश राजवटीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी फार मोठे योगदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला.
          
व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नगरसेवक उमेश सावंत, कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, राजे विक्रमसिंह घाटगे कागल को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक राजू जाधव, रणजीत पाटील, विजय काळे, सतीश सोनुले, पाॅल सोनुले,  शहाजी सोनुले,  आनंदा हेगडे, राहुल कारंडे, संतोष सोनुले, अमर सोनुले,  पंकज घुले, महादेव सोनुले, बाळासाहेब हेगडे, विजय सोनुले, रोमाण्णा सोनुले, विशाल आवडे आदी प्रमुख उपस्थित होते.
           
यावेळी  विजय काळे यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर व्याख्यान झाले. तसेच; केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मनोगते व्यक्त केली.
        
स्वागत अरविंद कारंडे यांनी केले. प्रास्ताविक रोम्माना सोनुले यांनी केले. आभार संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id