SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 984 कोटींचा निधी मंजूर, लवकरच दुहेरीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार : खासदार धनंजय महाडिक

schedule12 Feb 26 person by visibility 869 categoryदेश

कोल्हापूर  : कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग एकेरी आहे. त्यामुळे नव्या गाड्या कोल्हापुरातून सुरू करणे तसेच रेल्वे गाड्यांचे क्रॉसिंग याला मर्यादा येत होत्या. त्यामुळे कोल्हापूर ते मिरज या सत्तेचाळीस किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण व्हावे ही कोल्हापूरकरांची प्रदीर्घकाळची मागणी आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने या प्रश्नासाठी पाठपुरावा केला. त्यातून कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. सुमारे 47 किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय 984 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

 त्यामुळे नजीकच्या काळात कोल्हापूर मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण होईल, याची खात्री वाटत आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. एकदा का कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले की अनेक लांब पल्ल्याच्या नव्या रेल्वे गाड्या कोल्हापुरातून सुरू होऊ शकतील. 

शिवाय वंदे भारत सारख्या नव्या आलिशान रेल्वे गाड्या कोल्हापूरला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली सुमारे दोन दशके कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व्हावे ही मागणी होती.

 त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले होते. खासदार महाडिक यांनी या प्रश्न संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण लवकरच पूर्ण होईल, आणि कोल्हापूरकरांची मागणी लवकरच पूर्ण होईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id