धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!
schedule20 Apr 26 person by visibility 166 categoryगुन्हे
आजरा : निष्पापांचा बळी घेणाऱ्या बेजबाबदार कारभाराचा आजऱ्यात थरार; प्रशासकीय यंत्रणा हादरली आजरा शहरात जेसीबीच्या साहाय्याने जुने घर पाडताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने भीषण दुर्घटना घडली आहे.
भरवस्तीत काम सुरू असताना अचानक भिंत रस्त्यावर कोसळल्याने तेथून जाणाऱ्या प्राध्यापिका ज्योती कुंभार आणि १४ वर्षीय वैष्णवी भोसले यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला, तर ललिता भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने संताप व्यक्त होत आहे भररस्त्यात काम सुरू असताना साधी खबरदारी का घेतली गेली नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
घटनेची भीषणता पाहता नगराध्यक्षांसह तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली, मात्र या निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.