महात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरी
schedule19 Apr 26 person by visibility 144 categoryराज्य
मुंबई : महात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार (प्र.ना.उ.सु.) यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, सविता शानभाग, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, मंत्रालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.