SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरव

schedule19 Apr 26 person by visibility 151 categoryशैक्षणिक

▪️समाजमाध्यमांवरून लघुचित्रफीत केली प्रसारित

कोल्हापूर : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) शिवाजी विद्यापीठाच्या कॉमन फॅसिलिटी सेंटर- सोफिस्टिकेटेड अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज (सीएफसी– सैफ) या विभागाच्या दर्जेदार कामगिरीची दखल घेतली आहे. विद्यापीठाच्या या केंद्रात उपलब्ध असलेली अत्याधुनिक उपकरणे आणि सुविधा यांची माहिती देणारी लघुचित्रफीत केंद्रीय विभागाने त्यांच्या समाजमाध्यमांच्या सर्व मंचावरून प्रदर्शित केली आहे. अशा प्रकारे केंद्रीय मंत्रालयाकडून गौरव होण्याचा बहुमान मिळविणारे शिवाजी विद्यापीठाचे ह देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या एक्स, लिंक्डइन आणि फेसबुक या समाजमाध्यमांच्या मंचांवरून शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्राची माहिती देणारी तीन मिनिटांची लघुचित्रफीत प्रदर्शित केली आहे. लघुचित्रफीतीसमवेत लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे पाठबळ लाभलेल्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील सोफिस्टिकेटेड अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज' (#SAIF) हे केंद्र संपूर्ण भारतातील संशोधक, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना अत्याधुनिक विश्लेषणात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा पुरवत आहे. मंत्रालयाच्या सैफ कार्यक्रमांतर्गत २०१४ मध्ये स्थापन झालेले हे केंद्र, अतिप्रगत उपकरणांच्या साहाय्याने अचूक विश्लेषण आणि नाविन्यपूर्णतेला चालना देऊन वैज्ञानिक संशोधनाला यशस्वीपणे बळकटी देत आहे.’

या पोस्टमध्ये मंत्रालयाने खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह, सचिव अभय करंदीकर यांच्यासह केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय, सीएसआयआर-इंडिया यांना टॅग केले आहे.

या केंद्राचे संचालक डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांनी मंत्रालयाकडून झालेल्या गौरवाबद्दल समाधान व्यक्त केले. केंद्राच्या वाटचालीविषयी सांगताना ते म्हणाले, विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्रामध्ये एकूण सोळा विविध अतिउच्च दर्जाची अत्याधुनिक वैज्ञानिक संश्लेषक उपकरणे आहेत. त्यावर भारतातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांमधील संशोधकही आपल्या संशोधनाचे नमुने तपासणीसाठी पाठवित असतात. मागील पाच वर्षांचा आढावा घेत असता, सन २०२०-२१मध्ये देशभरातून २४०० नमुने तपासणीसाठी आले होते. त्या माध्यमातून दोन लाख ४४ हजार रुपये इतके उत्पन्न विद्यापीठास मिळाले होते. आता २०२५-२६मध्ये देशभरातील संशोधन संस्थांकडून तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या आठ हजारांच्या घरात गेली असून उत्पन्नही ५२ लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. त्याखेरीज केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळा, विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम या माध्यमातून दरवर्षी साधारणतः १२०० विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरण हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येते.

केंद्राच्या या सर्व विज्ञानाभिमुख कामगिरीची केंद्रीय मंत्रालयाने दखल घेतली, याचा मोठा आनंद वाटत आहे. यापुढील काळातही येथील उपकरणांची संख्या वाढविण्यात येऊन आणखी दर्जेदार व आधुनिक विश्लेषण सुविधा संशोधकांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळेच हा सन्मान केंद्राला लाभला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id