SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्ण

जाहिरात

 

जागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धा

schedule20 Apr 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागामार्फत नुकताच जागतिक कला दिन (१५ एप्रिल) आणि जागतिक वारसा दिन (१८ एप्रिल) असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

विद्यापीठात या निमित्ताने 'रंग कुंचल्याचे' ही स्पॉट पेंटींग स्पर्धा शनिवारी (दि १८) घेण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेत हिंदी अधिविभागाच्या प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्यासह विभागातील सर्व शिक्षकही स्पर्धक म्हणून सहभागी झाले. 
स्पर्धेत हिंदी अधिविभागातील शिक्षक विद्यार्थ्यांसह भाषा प्रौद्योगिकी, संगीत व नाट्यशास्त्र आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी व संशोधकांनीही सहभाग घेतला. सर्वांनीच स्वतःला रंगांच्या दुनियेत हरवून चित्रकलेचा आनंद घेतला.

 वि.स. खांडेकर भाषा भवनच्या मागील तलावाजवळ पार पडलेल्या या स्पर्धेत डॉ. प्रकाश निकम, डॉ. गीता दोडमणी, डॉ. जयसिंग कांबळे, प्रतीक्षा ठुंबरे आदींनी सहभाग घेतला तसेच संयोजन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id