SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

परीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

schedule23 Oct 26 person by visibility 332 categoryराज्य

◼️दुष्काळग्रस्त तालुक्यांतील २,४०,३६५ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा
 
मुंबई : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा एकही रुपया न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, असा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीतपणे व्हावी आणि पात्र विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा विभागाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.

 परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागू नये, यासाठी अर्ज प्रक्रियेत ‘झिरो चलन’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना कोणतेही परीक्षा शुल्क न भरता परीक्षा अर्ज दाखल करता येत आहेत. तसेच, सर्व विद्यापीठांनी परीक्षा शुल्कमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात परिपत्रके जारी केली आहेत.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना भरलेले शुल्क परत करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील कोणताही पात्र विद्यार्थी परीक्षा शुल्कमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, तसेच विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व विद्यापीठांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीसंदर्भात  शैक्षणिक अडचण असल्यास संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ किंवा जनसंपर्क अधिकारी ,विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन उच्च व इतर तंत्र शिक्षण विभागाने केले आहे.

◼️विद्यापीठनिहाय संपर्क अधिकारी :

मुंबई विद्यापीठ, मुंबई – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९), जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड (९८३३९६९९७७).

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. सविता कुलकर्णी (७७२००३६७७४), तसेच अजय ठुबे (७५८८१६९१३४).

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९), विद्यार्थी विकास संचालक  अलोक जत्राटकर (८६९८९२८०८०).

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अंधारे (९९७५०५५१५५), विद्यार्थी विकास संचालक डॉ. काळवणे (७०२०६३४५०२).

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे (९९२३४०९४९१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. चिखलीकर (८३९०६६६७७७).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बाबासाहेब डोळे (८२३७००६५७२), विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभोरे (९४२३७०५०८१).

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील (९४२३१८५०७३), विद्यार्थी विकास संचालक महाले (९८२३१९२८३१).

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी (९८५००४२३५७), विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर (८८५५०८३९६४).

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनुप पळसोकर (८३७८९७४२४०), विद्यार्थी विकास संचालक डॉ. विजय तांगडे (९५४५११२५५५).

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन मंगुळे (९५११९१०५७५), विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रिया गेडाम (९०४९४७४११९).

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक संजय नेरकर (९९२२४४४४६७), विद्यार्थी विकास संचालक डॉ. अंकुश चव्हाण (९६८९६७२५०९).

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. भटूप्रसाद पाटील (७७९८९२५४८५), विद्यार्थी विकास संचालक महेंद्र बनसोडे (९७६६०५९०७६).

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id