SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

हसूर येथील आरोग्य शिबिरात ३८३ नागरिकांची तपासणी

schedule20 Oct 26 person by visibility 329 categoryआरोग्य

◼️आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ९ हजार २१० वर

हसूर : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत हसूर येथे आयोजित शिबिरात ३८३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २५१ नागरिकांची नेत्र तपासणी, तर १३२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरानंतर अभियानातील एकूण लाभार्थ्यांची संख्या ९ हजार २१० वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या या अभियानाला शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हसूर येथील शिबिरातही नागरिकांनी सहभाग नोंदवत मोफत आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध होत असून, आजारांचे वेळीच निदान करण्यास मदत होत आहे.

यावेळी बाबासाहेब पाटील, नेमगोंडा पाटील, पायगोंडा पाटील, मलगोंडा पाटील, आप्पासो चौगुले, रावसो मिनचे, रमेश चौगुले, तेजकुमार माणगांवे, बंडु माणगांवे, अभिजित पाटील, चेतन पाटील, देवराय कांबळे, अनीता पाटील, कुसुम पाटील, सुशिला माणगांवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id