SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

नीट पेपर लीक: केंद्र सरकारची कठोर कारवाई; एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

schedule24 Jul 26 person by visibility 348 categoryदेश

नवी दिल्ली : नीट-यूजी (NEET-UG) प्रवेश परीक्षेतील अनियमितता आणि गैरकारभाराविरोधात तीव्र आंदोलने झाल्यानंतर, केंद्र सरकारने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आपल्या ४७ अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून बडतर्फ केले असून, दोषींवर कायदेशीर व गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयाकडून मोठे अभियान राबवले जात आहे. यापूर्वी १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी १९९४ च्या बॅचचे अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, परीक्षा आयोजनाच्या 'आउटसोर्सिंग' मॉडेलमध्येही आमूलाग्र बदल केले जाणार आहेत.

एनटीएवर NEET, JEE, CUET, UGC-NET यांसारख्या प्रमुख परीक्षांची जबाबदारी आहे. मात्र, कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने एजन्सीच्या संरचनेत व्यापक बदल सुरू आहेत. एनटीए पूर्णपणे बरखास्त करण्याचा प्रस्ताव नसला, तरी यंत्रणा बळकट करण्यासाठी आणखी कठोर निर्णय घेतले जातील.

या कारवाईच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाने 'सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४' मधील सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यात संसदेत मांडल्या जाणाऱ्या या नव्या कायद्यानुसार, संघटित पद्धतीने पेपर लीक करणाऱ्या गुन्हेगारांना १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि १० कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची कठोर तरतूद करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id